वाटा करियरच्या
करियरच्या वेगळ्या वाटा
आज सकाळीच मला माझ्या असिस्टंटचा मेसेज आला, करियर कॉउंसलिंग साठी अपॉइंटमेंट आहे. ठरल्या वेळेवर हुशार रावांनी माझ्या कॅबिनचा दरवाजा वाजवला. खरं तर जॉब मार्केट हिमनगप्रमाणे आहे पण अनेक जण मळलेल्या रस्त्यावर जॉब मिळाला नाही की अनेकजण नंतर करियर काउंसलिंगसाठी जिनियस ब्रिज मध्ये येतात तशीच केस असावी असा अंदाज हुशार रावांनी खोटा ठरवला. हुशारराव नावाप्रमाणेच हुशार होते. 10वी - 12 वीचे रिझल्टस आणि प्रवेशाच्या गोंधळात न अड़कता हुशाररावांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. त्यांना डिग्री पलीकडच्या जॉब देणारया अभ्यासक्रमाविषयी माहिती हवी होती. खरं तर मला याचं खूप कौतुक वाटलं| कसं आहे मित्रांनो जेवढी मागणी इंजीनियर ‚ डॉक्टर‚ आर्कीटेक्ट‚ बीकॉम‚ बीएससी या डिग्रींना आहे त्यापेक्षा खूप जास्त जॉब्स हे काही सर्टिफिकेटसमुळे मिळू शकतात. शिपींग, आयात-निर्यात‚ वायनरी‚ पर्फ्यूमनरी‚ चहा आणि कॉफी टेस्टींग‚ शेअर मार्केट यासारखे अनेक कोर्स आणि असंख्य क्षेत्रे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात हे हुशाररावांना कळल.
हया सगळ्यांमध्ये त्यांना आणखी एक गोष्ट समजावली की, सगळ्या डिग्री आणि सर्टिफिकेटस् हयांच्या बरोबरीने गरजेची असते ती संवादकला| नोकरी मिळवण्यापासून ते प्रमोशन पर्यंत आणि घरातल्यांना सांभाळुन घेण्यापासून ते खूप लोक जोडण्यापर्यंत असंख्य कामे ही संवादकला करून देऊ शकते. तसेच हया कलेची आणखी एक बाजू म्हणजे लँगवेज सर्टिफिकेटस्. जगभर वाढत जाणारा आपल्या देशाचा व्यापर‚ सेवा उद्योग आणि आपल्या देशात येऊ घातलेल्या असंख्य परदेशी कंपन्यांना संवादकला आणि परदेशी भाषेवर प्रभुत्व असणारे लोक हवे असतात. परदेशी बँका किंवा कंपन्यांना तुमच्या डिग्री पेक्षा या भाषेवरील प्रभुत्व आणि या भाषांमध्ये तुम्ही पास झाल्याचं प्रमाणपत्र महत्वाचं असतं. तुम्ही अगदी 10 वी‚ 12वी नंतर फ़ॉरेन लँगवेज शिकू शकता. कोणत्या भाषांना मागणी आहे‚ कोणत्या देशांना याची गरज आहे‚ कोणती अशी क्षेत्रे आहेत हया संबंधी सगळी माहिती मिळवण्यासाठी हुशाररावांनी आमची करियर कॉउंसेसिंगची अपॉइंटमेंट घेतली होती. आज डिग्री अधिक फ़ॉरेन लँगवेज म्हणजे 'चेरी ऑन द केक'.
हुशाररावांनी मिळवलेली माहिती काहीशी अशी होती. जापनीज‚ जर्मन‚ स्पॅनिश आणि मॅंडारिन (चायनीज) या जास्त मागणी असणारया भाषा असून जवळपास सर्वच क्षेत्रात त्यांना मागणी आहे. प्रत्येक भाषेची थोडक्यात माहिती घेताना आपण कोणती भाषा निवडावी यासाठी आठवड्यातून एकदा एका भाषेची माहिती घ्यायची असा ठराव आम्ही मिळून पास केला. सुरुवात केली जापनीज भाषेपासून
जापनीज — आशिया खंडातली ही भाषा तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जॉब देऊ शकते. एन५ (N5) ते एन१ (N1) अशा त्यात लेव्हलस् असतात. या भाषेला तंत्रज्ञान जगतात खूप मागणी आहे. दिसायला थोडी किचकट असणारी ही चित्रलिपी हिरागाना‚ काताकाना आणि कांजी या तीन प्रकारच्या लिपींचा वापर करते. एन५ ते एन३ हे जॉब मिळवण्यासाठी पुरेसे आहे. आयटी क्षेत्रात या भाषेला खूप मागणी आहेच, पण त्याच बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), फार्मा‚ मेकेनिकल‚ इंफ्रा‚ जहाज बांधणी‚ इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातही संधी आहेत. जर तुम्हाला ही भाषा येत असेल तर कोणत्याही ठराविक क्षेत्राचं बंधन नाही. सध्या “वयोवॄद्व” जपान भारतातून येऊ इच्छिणारया सगळ्या तरूणांचं स्वागत करायला उत्सुक आहे. अट एकच तुम्हाला जपानी भाषा आली पाहिजे. अगदी हॉटेल मधल्या कुक (स्वयंपाकी) पासून एखादया इनव्हेस्टमेंट कंपनीच्या सीईओ पर्यंत जपान आणि जगभरात संधी आहेत. अनेक जपानी कंपन्या बीई मॅकॅनिकल फ्रेशरच्या शोधात आहेत. तसेच अनेक स्कॉलरशिप देखील स्टुडंस साठी उपलब्ध आहेत. माझ्याकडे सध्या आलेल्या माहितीनुसार बीई मॅकॅनिकल फ्रेशरच्या किमान 500 जागा असून जपानी भाषा येणारे 50 इंजिनिअर्स मिळवताना दमछाक होत आहे. फक्त एवढेच नाही तर जापनीज भाषा येणार्या बीए, बीकॉम विद्याथी यांना देखील मागणी आहे| अनेक मल्टीनॅशनल कंपन्यादेखील जपानी भाषा येणारयांच्या शोधात आहेत त्यात भर म्हणजे “मेक इन इंडिया”च्या अंतर्गत अनेक मोठया जपानी कंपन्या भारतात येत आहेत त्यामुळे भविष्याच्या दॄष्टीने यात प्रचंड मागणी असणार आहे. जगात तयार होणारया प्रत्येक महत्वाच्या वेबसाइट स्पॅनिशनंतर जपानी भाषेत बनवल्या जातात. संगणकाच्या महाजालाच्या जपानी भाषेला किती मागणी आहे हे यावरून लक्षात येते.
जपानी भाषेबद्दल थोड्या लिंक आणि काही लेख देऊन हुशाररावांची पुढच्या आठवड्यातली भेटीची वेळ पक्की केली.
मेंदूसाठी थोडा खुराक



Comments
Post a Comment