Posts

वाटा करियरच्या (भाग ३)

Image
 करियरच्या वेगळ्या वाटा (भाग ३) (पूर्वार्ध) घड्याळाच्या काट्याशी बरोबरी करत हुशारराव माझ्या केबिन मध्ये आले. भविष्यात कोणत्या क्षेत्राला मागणी असेल, कोणती सर्टिफिकेट मिळवणे गरजेचे असेल या बद्दल चर्चा सुरु  झाली. हुशाररावांशी ही चर्चा चालू असतानाच आमच्या तन्वी मॅडम एका स्पेनच्या पाहुणीला ऑफिस मध्ये घेऊन आल्या. 'सारा' ही अर्ध जग फिरून आलेली इंटरनॅशनल बिसनेस सांभाळणारी होती. आत आल्या आल्या " ओला ! कोमो एसतास अस्ते SS " अशी गोड विचारणा केली. वर्ल्ड ट्रेड सेण्टरला असलेल्या कार्यक्रमात जेंव्हा साराला आमच्या उपक्रमाबद्दल कळाले तेंव्हा ती भेटायला आली.  आमचा चहा पानाचा कार्यक्रम चालू असतानाच हुशाररावांनी  पुन्हा तोंड उघडले ते सारा वर प्रश्नांची सरबत्ती करत. ' जर्मन, जपानी किंवा फ्रेंच या सारख्या भाषा असताना स्पॅनिश भाषेला काही स्कोप आहे का हे बघण्यासाठी हुशारराव उत्सुक होतें. त्यांना मिळालेली माहिती साधारण अशी होती की, स्पॅनिश ही  यु एस मधली महत्त्वाची भाषा असून 'युनायटेड नेशन्सची' अधिकृत (ऑफिशिअल) भाषा आहे. दक्षिण अमेरिका, युरोप या सह संपूर्ण...

वाटा करियरच्या (भाग २ )

Image
 करियरच्या वेगळ्या वाटा (भाग २ )        मागच्या आठवड्यात ठरवल्याप्रमाणे हुशार राव अगदी वेळेवर आले, पण  जर्मन डॉक्युमेंट्सच्या  भाषांतराचे  काही ईमेल क्लाएंटला परत हवे होते त्याची गडबड  सुरु  असल्यामुळे त्यांना थोडी वाट बघावी लागली. बडबडया  स्वभावाच्या हुशार रावांनी तेवढ्यात आमच्या ऑफिस मधे कसली धावपळ चालू आहे ते विचारुन घेतल. भाषांतराची काम नेहमीच अर्जन्ट येतात, त्यात सरकारी कागद पत्रांची मजा अशी की, "कालच  द्यायची होती, एकाच  दिवसाचा वेळ दिला आहे" , अशी असतात. पण  जर्मन क्लाएंटची कामं अगदी व्यवस्थित प्लान करुन येत असली तरी कधीतरी अशी  गडबड  असतेच. अपेक्षेप्रमाणे जर्मन कागद पत्रांबद्दल ऐकून हुशार रावांचा गप्पांचा होरा नंतर जर्मन भाषेच्या उपयुक्ततेकडे वळला.  जर्मन — दोन महायुद्वांमध्ये हारून‚ रसातळाला जाऊन देखील पहील्या पाच महासत्तांमध्ये जर्मनीला त्यांच्या तंत्रज्ञान आणि संशोधक वॄत्तीला स्थान आहे. सर्वोत्तम बनविण्याचा ध्यास असलेल्या जर्मन कंपन्यांनी आपली उत्पादने जगभरात पोहोचव...

वाटा करियरच्या

Image
   करियरच्या वेगळ्या वाटा      आज सकाळीच मला माझ्या असिस्टंटचा मेसेज आला, करियर कॉउंसलिंग साठी अपॉइंटमेंट आहे. ठरल्या वेळेवर हुशार रावांनी माझ्या कॅबिनचा दरवाजा वाजवला. खरं तर जॉब मार्केट हिमनगप्रमाणे आहे पण अनेक जण मळलेल्या रस्त्यावर जॉब मिळाला नाही की अनेकजण नंतर करियर काउंसलिंगसाठी जिनियस ब्रिज मध्ये येतात तशीच केस असावी असा अंदाज हुशार रावांनी खोटा ठरवला. हुशारराव नावाप्रमाणेच हुशार होते. 10वी - 12 वीचे रिझल्टस आणि प्रवेशाच्या गोंधळात न अड़कता हुशाररावांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. त्यांना डिग्री पलीकडच्या जॉब देणारया अभ्यासक्रमाविषयी माहिती हवी होती.  खरं तर मला याचं खूप कौतुक वाटलं| कसं आहे मित्रांनो जेवढी मागणी इंजीनियर ‚ डॉक्टर‚ आर्कीटेक्ट‚ बीकॉम‚ बीएससी  या डिग्रींना आहे त्यापेक्षा खूप जास्त जॉब्स हे काही सर्टिफिकेटसमुळे मिळू शकतात.  शिपींग, आयात-निर्यात‚ वायनरी‚ पर्फ्यूमनरी‚ चहा आणि कॉफी टेस्टींग‚ शेअर मार्केट  यासारखे अनेक कोर्स आणि असंख्य क्षेत्रे आपल्याला उपलब्ध होऊ शक...