वाटा करियरच्या (भाग ३)


 करियरच्या वेगळ्या वाटा (भाग ३)






(पूर्वार्ध)

घड्याळाच्या काट्याशी बरोबरी करत हुशारराव माझ्या केबिन मध्ये आले. भविष्यात कोणत्या क्षेत्राला मागणी असेल, कोणती सर्टिफिकेट मिळवणे गरजेचे असेल या बद्दल चर्चा सुरु  झाली. हुशाररावांशी ही चर्चा चालू असतानाच आमच्या तन्वी मॅडम एका स्पेनच्या पाहुणीला ऑफिस मध्ये घेऊन आल्या. 'सारा' ही अर्ध जग फिरून आलेली इंटरनॅशनल बिसनेस सांभाळणारी होती. आत आल्या आल्या " ओला ! कोमो एसतास अस्ते SS " अशी गोड विचारणा केली. वर्ल्ड ट्रेड सेण्टरला असलेल्या कार्यक्रमात जेंव्हा साराला आमच्या उपक्रमाबद्दल कळाले तेंव्हा ती भेटायला आली.  आमचा चहा पानाचा कार्यक्रम चालू असतानाच हुशाररावांनी  पुन्हा तोंड उघडले ते सारा वर प्रश्नांची सरबत्ती करत. 'जर्मन, जपानी किंवा फ्रेंच या सारख्या भाषा असताना स्पॅनिश भाषेला काही स्कोप आहे का हे बघण्यासाठी हुशारराव उत्सुक होतें. त्यांना मिळालेली माहिती साधारण अशी होती की, स्पॅनिश ही  यु एस मधली महत्त्वाची भाषा असून 'युनायटेड नेशन्सची' अधिकृत (ऑफिशिअल) भाषा आहे. दक्षिण अमेरिका, युरोप या सह संपूर्ण जगात बोलली जाणारी ही  भाषा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातल्या कायद्यांमधले असंख्य शब्द स्पॅनिश भाषेतूनच आलेले आहेत. कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी शिकावीच अशी ही  भाषा. स्पॅनिश कंपन्या भारतात नावाजलेल्या नसल्या तरी स्पॅनिश वसाहतींमुळे आणि अनेक देशांवर राज्य केल्यामुळे ही  जवळपास २२ देशांची अधिकृत भाषा आहे.



स्पॅनिश जरी तंत्रज्ञानाची भाषा नसली तरी इम्पोर्ट एक्स्पोर्ट, बँकिंग , कायदे व्यवस्था, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रात गरजेची आहे. सिंगापूर मध्ये स्पॅनिश आणि मँडरिन  येणाऱ्या शिक्षकांची सध्या फार मागणी आहे हे पण तिने नमूद केले. मग हुशार रावांनी विचारले की  या भाषेची आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या परीक्षा भारतात होतात का? DELE  आणि DIE  या जगभरात मान्यता असलेल्या परीक्षा असून सर्व युरोपियन पद्धती प्रमाणे स्पॅनिश भाषेच्या देखील ६ परीक्षा आहेत. A १, A २, बी १, बी २ आणि सी१ , सी२. प्रत्येक स्तरावर भाषेचे व्याकरण व वापर यात वाढ होत जाते.

याच बरोबर जिनिअस ब्रिजने खास 'बिझनेस स्पॅनिश' या खास व्यावसायिकांसाठी बनवलेल्या कोर्से बद्दल देखील थोडी माहिती मी हुशार रावांना दिली. चहा घेऊन सारा आणि हुशारराव  निघाले पण निघताना हुशारराव  पुढच्या आठवड्यातली अपॉइंटमेंट घ्यायला विसरले नाहीत.

Comments

Popular posts from this blog

वाटा करियरच्या